राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कौटुंबिक रागातून हत्या झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. दरम्यान हिंगोलीमधील अशीच एक घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सेनगाव तालुक्यातील सवना येथे बुधवारी मध्यरात्री दारूच्या नशेत वडील आपल्या आईला मारत होते. ते पाहून मुलगी त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेली.
तर रागाच्या भरात वडीलांनी तिच्याच डोक्यात लोखंडी रॉड घातला. रक्तबंबाळ झालेल्या मुलीचा रुग्णालयात घेऊन जाताना रस्त्यातच मृत्यू झाला आहे.
या मुलीचे नाव वैष्णवी विनोद भालेराव असं असून ती 9 वर्षाची आहे. तर आई रत्नमाला भालेराव वर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.