शेतकऱ्याने कोबीच्या शेतात घातल्या मेंढ्या

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील शेतकरी मधुकर शिंगणे यांना एकरी ६० हजार रुपये खर्चून पिकवलेली कोबी मेंढ्यांना चरायला द्यायची वेळ आली. बाजारात कोबीला भाव नाही, बाजारापर्यंत कोबी घेऊन जायचा खर्च परवडत नाही, यामुळे शेतकरी अडचणीत आला असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यानं कोबीच्या शेतात चक्क मेंढ्या चरायला घातल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना जिरवलेल्या घामाचा पैसा मिळत नसल्याने शेतकरी हतबल […]

शेतकऱ्याने कोबीच्या शेतात घातल्या मेंढ्या

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील शेतकरी मधुकर शिंगणे यांना एकरी ६० हजार रुपये खर्चून पिकवलेली कोबी मेंढ्यांना चरायला द्यायची वेळ आली. बाजारात कोबीला भाव नाही, बाजारापर्यंत कोबी घेऊन जायचा खर्च परवडत नाही, यामुळे शेतकरी अडचणीत आला असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यानं कोबीच्या शेतात चक्क मेंढ्या चरायला घातल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना जिरवलेल्या घामाचा पैसा मिळत नसल्याने शेतकरी हतबल होताना दिसत आहे.

काही वेळा व्यापारी शेतात येऊन शेतातील पीक उक्ते विकत घेतात. अशा वेळी शेतकऱ्यांना फायदा होतो. आता असे व्यपारी ग्रामीण भागात फिरकतच नाहीत. त्यामुळे शेतमाल बाजारपेठेत नेल्यावर कोबीला कवडीमोल भाव आल्यास तो तेथेच सोडून द्यावा लागतो. परिणामी तोडणी, कापणी, वाहतुकीचा खर्चही निघत नाही. शेतकऱ्याला मोकळ्या हताने घरी यावे लागते. कोबीच्या गड्ड्याला बाजारपेठेत कवडीमोल भाव आल्याने कोबीच्या शेतात शेतकऱ्याने शेळ्या-मेंढ्या सोडल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number