अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. दरम्यान, शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने हादरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडले असून राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. दरम्यान, शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे डबल इंजिनचे सरकार ट्रिपल इंजिन सरकार झाले आहे. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल. याचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल,”असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज होते. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर भुजबळ, मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तडकरे, धर्मराव बाबा अंत्राम व अनिल पाटील, बनसोडे आदि नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.