पवित्र केदारनाथ यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे. आज पहाटे ६.२० वाजता भाविकांसाठी केदारनाथचे कवाडं उघडण्यात आले. भारतात १२ ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. या पैकी ही केदारनाथ यात्रा आहे. आज गोठवण्याऱ्या थंडीत तब्बल सात हजार भाविकांनी मंदिराला भेट दिली. केदारघाटी हर-हर महादेव आणि जय भोलेनाथच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. मंदिराचे मुख्य द्वार उघडून केदारनाथचे रावल भीमाशंकर लिंग आणि मुख्य पुजारी यांनी शिवलिंग मंदिरात प्रवेश केला.
उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे मंगळवारी सकाळी 6.20 वाजता उघडले. मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी मंदिराचे दरवाजे उघडले. मंदिराला 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. गेल्या 72 तासांपासून येथे बर्फवृष्टी होत आहे. खराब हवामानामुळे मंदिरात जाणाऱ्या हजारो भाविकांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले आहे. यानंतरही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज 8 हजारांहून अधिक लोक बाबाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
२८ एप्रिलपर्यंत चारधाममध्ये पाऊस-बर्फवृष्टी चारधाममध्ये पुढील चार दिवस हवामान खराब राहणार आहे. हलका पाऊस आणि हिमवर्षाव देखील अपेक्षित आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा याबाबत यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तसेच येणाऱ्या भाविकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान केंद्रानुसार, राज्यातील डोंगराळ भागात २५ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.