दोन्ही जैन पंथीयामधील वाद मिटला

वाशीम जिल्ह्यातील जैन धर्मियांची काशी असलेल्या शिरपूर येथे अंतरिक्ष पार्शवनाथ मंदिरातील मूर्ती लेपनावरून श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथीयांमध्ये वाद झाला होता या वादाचे रूपांतर हाणामारीत सुद्धा झाले होते ,यानंतर श्वेतांबर पंथीयकडून निषेध रॅली सुद्धा काढण्यात आली होती मात्र पुन्हा दोन्ही गट आमने सामने आल्याने पुन्हा हा वाद चिघळा होता या नंतर पोलिसांनी दोन्ही गटातील […]

दोन्ही जैन पंथीयामधील वाद मिटला

वाशीम जिल्ह्यातील जैन धर्मियांची काशी असलेल्या शिरपूर येथे अंतरिक्ष पार्शवनाथ मंदिरातील मूर्ती लेपनावरून श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथीयांमध्ये वाद झाला होता या वादाचे रूपांतर हाणामारीत सुद्धा झाले होते ,यानंतर श्वेतांबर पंथीयकडून निषेध रॅली सुद्धा काढण्यात आली होती मात्र पुन्हा दोन्ही गट आमने सामने आल्याने पुन्हा हा वाद चिघळा होता या नंतर पोलिसांनी दोन्ही गटातील १५ लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल केले आता मात्र श्वेतांबर आणि दिगंबर दोन्ही पंथीयांमध्ये बैठक होऊन अखेर ३ दिवसांनंतर या वादावर तोडगा निघाला आहे.

अंतरिक्ष पार्शवनाथ यांच्या मूर्ती ज्या पद्धतीची आहे तशीच ठेवून मूर्तीची लेपन प्रक्रिया पार पडेल आणि ही लेपन प्रक्रिया २३ मार्च ला सुरू करण्यात येईल असे दोन्ही पंथांचा बैठकीत निर्णय होऊन दोन्ही पंथीयांनी शांत राहण्याचे आवाहन श्वेतांबर आणि दिगंबर मुनी यांच्याकडून करण्यात आले आहे. या निर्णयानंतर जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथातील लोकांकडून पेढे वाटत आनंद साजरा करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number