महाराष्ट्रातील प्रत्येकाचेच डोळे सत्तासंघर्षाच्या निकालाकडे लागले होते. अखेरीस गुरुवारी हा निकाल लागला असून शिंदे-भाजपा सरकार राज्यात कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
शिंदे गटातील १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? यावर सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु, सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. न्यायालय अपात्रतेचा निर्णय न्यायालय घेऊ शकत नाही असा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे, आता १६ आमदार पात्र की अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. अपात्रतेची निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे अध्यक्षांनी हा निर्णय लवकर लवकर द्यावा असे न्यायालयाने सांगितले आहे.