सिलेंडर पुन्हा महागला

देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली असून आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर १०५२.५० रुपयांवरुन थेट ११०२.५० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. तर देशाची राजधानी […]

सिलेंडर पुन्हा महागला

देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली असून आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर १०५२.५० रुपयांवरुन थेट ११०२.५० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. तर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी आता सर्वसामान्यांना ११०३ रुपये मोजावे लागणार आहे. अशाप्रकारे होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.

या निर्णयामुळे स्वयंपाक करण्यासाठी घरगुती तसेच रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या खर्चात वाढ होईल. म्हणजे घरी स्वयंपाक करून जेवणे आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणे हे दोन्ही आता महागले आहेत. लक्षात घ्या की नियमानुसार जर तुम्ही सबसिडी घेतली असेल तर घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दरवर्षी १४.२ किलो वजनाचे १२ सिलेंडर सबसिडाइज्ड रेटमध्ये अर्थात सवलतीच्या दरात मिळतील. तर अतिरिक्त सिलेंडरसाठी घरगुती वापराच्या सिलेंडरचे नवे दर लागू होणार आहेत.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाली असून त्याची किंमत तब्बल ३५०.५० रुपयांनी वाढली आहे. ३५०.५० रुपयांनी महागल्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत २११९.५० रुपये प्रति सिलेंडरवर आली. मुंबईत एलपीजीची किंमत १०५२.५० रुपयांवरून ११०२.५० रुपये, कोलकातामध्ये एलपीजीची किंमत १०७९ रुपयांवरून ११२९ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत १०६८.५० रुपयांवरून १११८.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. तब्बल ८ महिन्यांनी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number