परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण मधील परशुराम घाट सध्या प्रवाशांची डोकेदुखी ठरताना दिसत आहे. पाऊस सुरू होऊन दोन ते तीन दिवस झाले असताना परशुराम घाटातील डोंगरावरील माती व दगड रस्त्यावर येण्याचे सत्र चालूच आहे. कधीही दगड व माती रस्त्यावर येईल या भीतीने या घाटातून प्रवास करताना प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. पहिल्याच मुसळधार […]

परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण मधील परशुराम घाट सध्या प्रवाशांची डोकेदुखी ठरताना दिसत आहे. पाऊस सुरू होऊन दोन ते तीन दिवस झाले असताना परशुराम घाटातील डोंगरावरील माती व दगड रस्त्यावर येण्याचे सत्र चालूच आहे. कधीही दगड व माती रस्त्यावर येईल या भीतीने या घाटातून प्रवास करताना प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.

पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटाला असलेला धोका समोर आला आहे. घाटात किरकोळ दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारच्या घटनेत घाटातून जाणारी एक गाडी थोडक्यात बचावल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.महामार्गावरील परशुराम पेढे या गावाला दरडींचा धोका आजही कायम आहे. अद्याप संरक्षक भिंतही उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे दुर्गवाडी येथील तसेच परशुराम पेढे परिसरातील जवळपास ६० ते ७० घरांना यामुळे दरडींचा धोका आहे.

मागील 25 एप्रिल ते दहा मे पर्यंत हा घाट वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. २५ एप्रिल ते दहा मे पर्यंत या घाटाचे काम पूर्ण करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले होते, मात्र तसे झाले नाही. पाऊस सुरू होऊन दोन ते तीन दिवस झाले मात्र घाटावरील दरड कोसळण्याचे सत्र कायमच आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number