संपूर्ण देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र – उद्धव ठाकरे

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर विरोधक विरोध करत असून संपूर्ण देशात जल्लोष साजरा होताना दिसत आहे. एकीकडे विरोधक विरोध करत असून दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मोदी आणि शहांचे अभिनंदन केले आहे. आज संपूर्ण देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच जम्मू -काश्मीर हा सदैव भाराताचा […]

संपूर्ण देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र – उद्धव ठाकरे

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर विरोधक विरोध करत असून संपूर्ण देशात जल्लोष साजरा होताना दिसत आहे. एकीकडे विरोधक विरोध करत असून दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मोदी आणि शहांचे अभिनंदन केले आहे. आज संपूर्ण देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच जम्मू -काश्मीर हा सदैव भाराताचा भाग होता, आहे आणि राहिल असेही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

अमेरिकेने काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची चर्चा सुरू असताना आमच्या देशाचा प्रश्न असून इतर देशांनी नाक खुपसू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आज झालेल्या एतिहासीक निर्णायासाठी मोदी आणि शहांचे मी अभिनंदन करतो.

भारत आज खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून बाळगलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.

जे या निर्णयाचा विरोध करतील त्यांचा सरकार चांगलाच समाचार घेत असल्याचे म्हटलं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी खूप आनंद झाला असता असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number