नीट पेपरफुटीविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस आक्रमक वळण मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आंदोलनाचे पडसात महाराष्ट्रात पडत असून या आंदोलनामुळे मुबंईच वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच नीट पेपरफुटीच्या आंदोलनासंदर्भात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुंबई पोलिसांकडून विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होण्यावरुन धमकी दिली जात असल्याच आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. आंदोलनात दिसलात तर 50 ग्रॅमच्या पावडर टाकून गुन्हा दाखल करू अशी धमकी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. तसेच यामुळे तुमचं आयुष्य वाया जाईल. जामीन मिळणार नाही. तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय असेही तो पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना म्हणत असल्याचे काँग्रेसकडील व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “एका व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मुंबई पोलीस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी देत आहे की, जर ते पुन्हा आंदोलनासाठी परत आले, तर त्यांना खोट्या ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये फाशी देऊन जन्मभर तुरुंगात सडवले जाईल. जर हे खरे असेल, तर हा केवळ विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न नाही, तर लोकशाही हक्कांवरचा थेट हल्ला आहे. आवाज उठवणे हा गुन्हा नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे जबाबदारीने दिली पाहिजेत, धमक्यांनी नव्हे.”
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, तसेच महिला विद्यार्थिनींचे कपडेही फाडण्यात आले आहेत. त्यांनतर आता मुंबई पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी देण्यात आला आहे. सदर व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र या व्हायरल व्हिडिओमुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तसेच यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.
एक वायरल वीडियो में दावा किया गया है कि @MumbaiPolice प्रदर्शन कर रहे छात्रों को धमका रही है कि अगर वे दोबारा प्रदर्शन करने लौटे, तो उन्हें झूठे ड्रग्स के मामले में फँसा दिया जाएगा और पूरी ज़िंदगी जेल में सड़ना पड़ेगा। अगर यह सच है, तो यह सिर्फ़ छात्रों को डराने की कोशिश नहीं,… pic.twitter.com/36KescEmro — Mumbai Congress (@INCMumbai) July 23, 2026