चीनवासी जाणार चंद्रावर

मुंबई ,२९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे. सुट्टीत मामाच्याघरी जायला आपल्याला खूप आवडते. मात्र माणूस आता आपल्या चांदोमामाच्या घरी जाण्याचा विचार करू लागलाय. होय, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने आजपर्यंत बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. दरम्यान आता थेट चंद्रावर घर बांधून राहण्याचं स्वप्न देखील मानव पूर्ण करणार आहे. जगात अनेक […]

चीनवासी जाणार चंद्रावर

मुंबई ,२९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे. सुट्टीत मामाच्याघरी जायला आपल्याला खूप आवडते. मात्र माणूस आता आपल्या चांदोमामाच्या घरी जाण्याचा विचार करू लागलाय. होय, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने आजपर्यंत बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. दरम्यान आता थेट चंद्रावर घर बांधून राहण्याचं स्वप्न देखील मानव पूर्ण करणार आहे.

जगात अनेक देशांनी आपल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर अवकाशात झेप घेतली. त्यानंतर आता चीन हा देश चक्क चंद्रावर घर बांधून राहण्याचा विचार करत आहे. यासाठी चीनकडून अनेक मोहिमांवर काम सुरु झालं आहे. चीनमधील चायना डेली या वृत्तपत्राच्या अहवालानुसार चीन हा चंद्रावर घरे बांधण्यासाठी सुरूवात करणार आहे. यासाठी ते 3D प्रिटींग तंत्रज्ञानाची मदत घेणार आहेत. या मोहिमेसाठी चीनने चांग ई- 6, चांग ई- 7,आणि चांग ई- 8 असे वेगवेगळे टप्पे निश्चित केले आहेत. यातील चांग ई- ८ ही मोहिम चीनची विशेष मोहिम आहे. या मोहिमेअंतर्गत माणसं चंद्रावर राहू शकतील का? मानवासाठी अनुकूल वातावरण आहे का? आणि तेथील जमिनीखाली खनिजे आहेत का? याची माहिती गोळा केली जाणार आहे. तर चीन ‘रोबोटिक मेसन’च्या माध्यमातून मातीच्या विटा बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. चंद्रावरील उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी येत्या २०३०पर्यंत चीन चंद्रावर प्रवासी माणसं पाठवणार आहे. आता चीनच्या या मोहिमेचं नेमकं फळ काय असेल हे येणारा काळच आपल्याला सांगेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number