मुख्यमंत्री अवकाळीच्या नुकसानीचा आढावा घेणार

राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आणि त्याबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी बैठक घेणार आहेत. दुपारी १ वा. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. राज्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. […]

मुख्यमंत्री अवकाळीच्या नुकसानीचा आढावा घेणार

राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आणि त्याबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी बैठक घेणार आहेत. दुपारी १ वा. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे.

राज्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळीमुळे १२ जिल्ह्यांमधील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मका, हरभरा, गहू, केळी, मिरची आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसामान्यांचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पश्चिम विदर्भात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त परिस्थितीचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार पाहणी दौरा करणार आहेत. तर, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात कृषिमंत्री शेतकऱ्यांना भेटी देणार आहेत. नाशकात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. तर शेतात गारांचा खच पडल्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. कळवणच्या मानूर, देवळा तालुक्यातील चिंचवे, वाजगाव परिसरातही गारा पडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number