राज्याच्या मुख्यमंत्री पदी असताना राज्याच्या जनतेचा आणि राजकारणातील कामाच्या व्यापाचा भर पेलत वैयक्तिक जीवनाचा समतोल राखणे हे फार कठीण होऊन बसते. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (दि.२१ जून) अचानक सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरेगाव येथे पोहोचले. तर, मुख्यमंत्री सपत्निक दरे गावच्या शेतात चांगले रमले आहेत.
मुख्यमंत्री बुधवारी (दि.२१ जून) दुपारी २ वाजता साताऱ्यात पोहोचले. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयना विभागातील मुळगाव दरी येथे हेलिपॅडवर आल्यानंतर अचानक प्रोटोकॉलसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. हे हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, कोल्हापूर पोलीस अधिकारी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचा अचानक दौऱ्याचा नेमकं कारण काय? याबाबत अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र नेहमीच लवा जमा घेऊन येणारे मुख्यमंत्री यावेळी अचानक जिल्हा दौऱ्यावर आल्याने हा दौरा नेमका कशासाठी आहे? या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत अद्यापही कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दौरा याबाबत अनेक राजकीय तर्क वितर्क मांडले जात आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस दरे गावच्या खाजगी दौऱ्यावर असून त्यांनी सपत्निक शेतीमध्ये मशागत केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी जांभूळ,अळु, रासबेरी, स्ट्रॉबेरी, नारळाच्या झाडांची लागवड केली. यावेळी आ. महेश शिंदे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांसोबत शेतात जाऊन जमिनीत खड्डा खोदण्याचे मशीन चालवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्नीसह शेतात रमले. केळीची लागवड केली. कोयना धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. हा गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला . या कामाचा शुभारंभ देखील मुख्यमंतरी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.