‘सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या दिल्लीतील नवीन संसद भवनाचं लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. अवघ्या तीन वर्षांच्या विक्रमी कालावधीत या इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं. मात्र, या उद्घाटन सोहळ्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नव्या संसद भवनाच्या लोकार्पण […]

‘सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या दिल्लीतील नवीन संसद भवनाचं लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. अवघ्या तीन वर्षांच्या विक्रमी कालावधीत या इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं. मात्र, या उद्घाटन सोहळ्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला रविवारी सकाळी सुरुवात झाली. संसद भवन उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.मात्र, याचवेळी या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर काही विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच काँग्रेस,राष्ट्रवादी, राजद यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टि्वटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ठाकरे म्हणाले, आज देशाच्या नवीन संसद भवनाचं लोकार्पण झालं. संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे.

‘देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे. ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो ….’ असं ट्विट राज ठाकरेंनी केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number