देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर विविध राज्यांचे मनमोहक चित्ररथ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली दरवर्षीप्रमाणे दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला मित्र देशाचे राष्ट्रध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं इतिहासाची पुनरावृत्ती झालीय. भारतानं इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो हे या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित आहेत. 26 जानेवारी 1950 मध्ये भारताने आपला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला होता. त्यावेळी इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकर्णो हे प्रमुख पाहुणे […]

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर विविध राज्यांचे मनमोहक चित्ररथ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दरवर्षीप्रमाणे दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला मित्र देशाचे राष्ट्रध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं इतिहासाची पुनरावृत्ती झालीय. भारतानं इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो हे या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित आहेत. 26 जानेवारी 1950 मध्ये भारताने आपला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला होता. त्यावेळी इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकर्णो हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर 68 वर्षांनी पुन्हा एकदा इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला मित्र देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करतो.

भारताने यापूर्वी कधीही दोनपेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित केलं नाही, पण यावेळी मात्र, भारताने आसियान देशांच्या इतरही नऊ राष्ट्राध्यक्षांना भारतात आमंत्रित केलं आहे. यामध्ये म्यानमारच्या आंग सान सू ची, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष ली सीन लूंग, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष गुयेन जुआन फूक, मलेशियाचे राष्ट्राध्यक्ष नजीब रजक, थायलंडचे राष्ट्राध्यक्ष चान ओ चा, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डूटर्ट, कंबोडियाचे राष्ट्राध्यक्ष हुन सेन, ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्कियाह, लाओसचे राष्ट्राध्यक्ष थोनगलोउन सिसोउलिथ यांचा समावेश आहे. या प्रमुख पाहुण्यांचे बुधवारी रात्रीपासून भारतात आगमन झाले आहे.

राजपथावरील संचलनात यंदा प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते सीमा सुरक्षा दलातील महिला जवानांचे पथक. दुचाकीवर चित्तथरारक कसरती सादर करत त्या स्त्रीशक्तीचे झलकच दाखवणार आहेत. संचलनात कंबोडिया, मलेशिया, थायलंडमधील लोकनृत्यदेखील सादर केली जाणार आहे. ऑल इंडिया रेडिओ, आयकर विभागाचे चित्ररथही यात सहभागी होतील. याशिवाय देशाच्या विविधतेचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथही संचालनात असतील. महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

repblic1.jpg

तसेच,राजपथावर शिवराज्याभिषेकाचं भव्य दर्शन घडविण्यात आले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number