महाराष्ट्र बंदची हाक, मुंबईत पडसाद

परभणीतील आंदोलकांच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन जनतेचा संताप परभणीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

महाराष्ट्र बंदची हाक, मुंबईत पडसाद

परभणी: परभणीतील आंदोलकांच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन जनतेचा संताप: परभणीतील न्यायालयीन कोठडीत असलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवार १६ डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात शांततेत बंद पाळण्याचे आवाहन आंबेडकरी चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी बंद दरम्यान परभणी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील उपोषण मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

१० डिसेंबर रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून ११ डिसेंबरला बंद पुकारण्यात आला, ज्यात दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आणि काही व्यक्तींना ताब्यात घेतले.

यातील एक आरोपी, सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी, ज्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते, तो १५ डिसेंबर रोजी मृत्युमुखी पडला. सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील अनेक लोकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परभणीतील बाजारपेठ बंद झाली असून, आंबेडकरी अनुयायांनी रविवारी सायंकाळी समाज बांधवांची बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आणि परभणी जिल्ह्यात शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

रविवारी सायंकाळी सोमनाथ सुर्यवंशीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजी नगरला पाठविण्यात आला. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.आंबेडकरी जनतेच्या वतीने पुकारलेल्या या बंदमध्ये परभणी शहरातील संविधानाच्या विटंबनेमुळे मोठा आक्रमक रुख दिसून येत आहे. १५ डिसेंबर रोजी सोमनाथ सुर्यवंशीच्या कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाने परभणीतील वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे. त्याचवेळी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) कडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

मुंबईत देखील याचे पडसाद दिसू लागले आहेत. दहिसरमध्ये आरपीआय आठवले गटाकडून सर्व दुकानदारांना बंद पाळण्याची विनंती करण्यात आली आहे. मुंबईत ही परिस्थिती शांततापूर्ण असली तरी, परभणीतील घटनांमुळे संपूर्ण राज्यभरात तणावाची स्थिती आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number