दोघांचे मंत्रिमंडळ नियमबाह्य – राऊत

महाराष्ट्राचा राजकारण चांगलाच तापलं आहे. राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. तसेच जगात कुठे दोघांचे मंत्रिमंडळ कोणी पाहिले आहे का? दोघांचे कॅबिनेट हा चेष्टेचा विषय झाला असून याआधी महाराष्ट्राची अशी चेष्टा झाली नव्हती, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत पोहचताच शिवसेना […]

दोघांचे मंत्रिमंडळ नियमबाह्य – राऊत

महाराष्ट्राचा राजकारण चांगलाच तापलं आहे. राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. तसेच जगात कुठे दोघांचे मंत्रिमंडळ कोणी पाहिले आहे का? दोघांचे कॅबिनेट हा चेष्टेचा विषय झाला असून याआधी महाराष्ट्राची अशी चेष्टा झाली नव्हती, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत पोहचताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ३० जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता १६ दिवस उलटून गेले तरीही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. दर दोन-तीन दिवसांनी नवी तारीख मिळतानाची चर्चा सुरू असते. त्यामुळे या मुद्द्यावर राऊत यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले आहे.

तसेच राऊतांनी यावेळी संभाजीनगर धाराशिव ही नावं देणं लोकभावना आहे, त्याबाबत ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता तो निर्णय हे सरकार कसे रद्द करू शकते? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे यांनी तीन नामांतरांचा निर्णय घेतला होता. मात्र तो निर्णय कायदेशीर नसल्याचे सांगत शिंदे आणि फडणवीसांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा तो निर्णय घेतला आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी सराकरला लक्ष्य केले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number