बस कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सिटि लिंक शहर बस सेवा अखेर तीन दिवसानंतर पुन्हा सुरळीत झाली आहे.

बस कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

२९ जुलै, २०२४, नाशिक : नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सिटि लिंक शहर बस सेवा अखेर तीन दिवसानंतर पुन्हा सुरळीत झाली आहे. शहर बस पुन्हा धावणार असल्याने नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाच हजार रुपये पगार वाढ आणि एक रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. एलपीएलनुसार वार्षिक १५ ते २० सुट्ट्या देण्याचाही निर्णय झाला आहे. शहर बससेवेचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला होता. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number