राजगडाच्या पायथ्याशी आढळला तरुणीचा मृतदेह

वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली आहे. ही तरुणी मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील आहे. मृत तरुणीचे नाव दर्शना दत्ता पवार आहे. एमपीएससीच्या परीक्षेत सहाव्या आलेल्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दर्शना पुण्यातून १२ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता […]

राजगडाच्या पायथ्याशी आढळला तरुणीचा मृतदेह

वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली आहे. ही तरुणी मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील आहे. मृत तरुणीचे नाव दर्शना दत्ता पवार आहे. एमपीएससीच्या परीक्षेत सहाव्या आलेल्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दर्शना पुण्यातून १२ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल होती. या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात तरुणीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना ९ जून रोजी पुण्यातील एका खासगी अकॅडमीमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय दर्शनाला फोन करत होते. परंतु, तिने घरातील कोणाचेही फोन उचलले नाहीत. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जून रोजी पुण्यात येऊन अकादमीत चौकशी केली. त्यावेळी दर्शना ही राजगड किल्ला फिरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडील आणि पोलिसांकडून मुलीचा शोध सुरु होता. दर्शना ही एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती. तिची ‘रेंज फॉरेस्ट ऑफिसर’ या पदावर नुकतीच निवड झाली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number