पंढरपुरात घोंगडीची बाजारपेठ सजली

वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन कीर्तनात घोंगडीचे मोठे महत्त्व आहे. पंढरपूर यात्रेला आल्यावर विठ्ठलाची संतांची घोंगडी प्रसादरुपी घेऊन जाण्यासाठी घोंगडीची दुकाने सजताना दिसतात. बाल लोकरीच्या घोंगडीपासून सर्व प्रकार वारकरी हे मोठ्या आनंदाने पंढरपुरात घेत असतात. घोंगडी विक्रीमुळे पंढरपुरातील एका परिसरास घोंगडे गल्ली असे नाव देखील आहे. सावळ्या विठ्ठलाला दिवाळी आणि गुढीपाडव्या दिवशी घोंगडी घातली जाते. संत तुकाराम […]

पंढरपुरात घोंगडीची बाजारपेठ सजली

वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन कीर्तनात घोंगडीचे मोठे महत्त्व आहे. पंढरपूर यात्रेला आल्यावर विठ्ठलाची संतांची घोंगडी प्रसादरुपी घेऊन जाण्यासाठी घोंगडीची दुकाने सजताना दिसतात. बाल लोकरीच्या घोंगडीपासून सर्व प्रकार वारकरी हे मोठ्या आनंदाने पंढरपुरात घेत असतात. घोंगडी विक्रीमुळे पंढरपुरातील एका परिसरास घोंगडे गल्ली असे नाव देखील आहे.

सावळ्या विठ्ठलाला दिवाळी आणि गुढीपाडव्या दिवशी घोंगडी घातली जाते. संत तुकाराम महाराजांनी सर्व गाथा अभंग हे घोंगडीवर बसून लिहिले. प्रवचन कीर्तन देखील घोंगडीवर उभारून केली जातात. त्यामुळे घोंगडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या कर्नाटक, कोकण, विदर्भ, मराठवाडा या परिसरातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर घोंगडीची खरेदी केली जाते. त्यासाठी पंढरपुरात असणाऱ्या घोंगडे गल्लीतील अनेक दुकानं घोंगडीने सज्ज होताना दिसत आहेत. हाताने तयार होणारी घोंगडी, मशीनच्या माध्यमातून तयार होणारी घोंगडी, कोकणी आणि पावसाळ्यामध्ये वापरली जाणारी अनोख्या पद्धतीची गंजी केलेली घोंगडी अशा विविध घोंगड्यांच्या प्रकाराची विक्री या परिसरामध्ये होताना दिसते. पंढरपुरात घोंगडी खरेदीस वारकरी कायमचं पसंती देताना दिसतात पंढरपुरामध्ये विठ्ठलाला दिवाळीच्या पाडव्यादिवशी अंगावर घोंगडी घालून धनगरी पोषाख केला जातो. त्यामुळे विठ्ठलाच्या अंगावरील घोंगडी म्हणून देखील वारकरी घोंगडी घेताना दिसतात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number