मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही भागांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक, सार्वजनिक सेवा, शाळा-काॅलेज सर्वांवरच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याने आज, 6 जुलै रोजी काही भागांमध्ये रेड तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यामुळे येथील प्रशासनाने शाळा-काॅलेजला सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान मुंबई, पालघर, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा येथील प्रशासनाने शाळा आणि काॅलेजला सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक जारी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून गेल्या 24 तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहे. सातारा तालुका पाटण महाबळेश्वर जावली वाई या तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून अनावश्यक घराबाहेर पडू नका, असे प्रशासकीय यंत्रणेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.
? महत्त्वाची सूचना | नागरिकांच्या माहितीसाठी ?️ पुणे जिल्ह्यासाठी उद्या (दि. ६ जुलै २०२६) 'रेड अलर्ट' जारी हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै २०२६ रोजी 'रेड अलर्ट' जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी… pic.twitter.com/FOOYGgS3D7 — PMC Care (@PMCPune) July 5, 2026
शिवाय, गेल्या दोन दिवस मुंबईमध्ये जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पाणी भरला आहे. हवामान खात्याने जोरदार पाऊस होईल, असा इशारा दिला आहे. पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी आपले सेवा बंद ठेवली आहे. अनेक डबेवाल्यांच्या घरामध्ये पाणी गेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे अशा परिस्थितीत डबेवाले सायकल घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून डबेवाल्याने आज, सोमवारी आपली सेवा मुंबईमध्ये बंद ठेवली असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर सांगितले आहे.