८०च्या दशकातील अभिनेत्री दिसणार ‘बिग बॉस ओटीटी’त

मुंबई, १८ जून २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील गाजलेल्या रिऍलिटी शोमध्ये बिग बॉस या शोचा समावेश होतो. टीव्हीवर लोकप्रियता मिळवल्या नंतर बॉग बॉसने ओटीटीवर पदार्पण केले. पहिल्या यशस्वी पर्वानंतर आता बिग बॉस ओटीटी चे २ पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १७ जून रोजी या शोला सुरुवात झाली. आता पुढे काय होणार याची सर्व प्रेक्षकांना […]

८०च्या दशकातील अभिनेत्री दिसणार ‘बिग बॉस ओटीटी’त

मुंबई, १८ जून २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील गाजलेल्या रिऍलिटी शोमध्ये बिग बॉस या शोचा समावेश होतो. टीव्हीवर लोकप्रियता मिळवल्या नंतर बॉग बॉसने ओटीटीवर पदार्पण केले. पहिल्या यशस्वी पर्वानंतर आता बिग बॉस ओटीटी चे २ पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १७ जून रोजी या शोला सुरुवात झाली. आता पुढे काय होणार याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या शो मध्ये कोण कोण सहभागी होणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

‘बिग बॉस ओटीटी’ च्या दुसऱ्या पर्वात वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती सहभाग घेणार आहेत. दरम्यान यावेळी 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट ही देखील बिग बॉस ओटीटी-२ मध्ये सहभाग घेणार आहे. पूजा ही 13 वी स्पर्धक आहे. पूजाही बिग बॉसच्या घरातील शोमध्ये दिसणार आहे. पूजा भट्टचं या शोमध्ये असणं हे बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी सरप्राईझ असणार आहे.

पूजा भट्ट ही बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मुलगी आहे. तिने 2021 मध्ये नेटफ्लिक्स मालिका बॉम्बे बेगम्सद्वारे डिजिटल पदार्पण केले. चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्टमध्ये शेवटची दिसलेली पूजा आता बिग बॉस ओटीटी 2 वर दिसणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number