Pratap Sarnaik: ठाण्यातील मेट्रोला ‘पॉड टॅक्सी’ने जोडणार

घोडबंदर भागात 'पॉड टॅक्सी'ची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शुक्रवारी ठाणे पालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात यासंदर्भातील प्रकल्पाचे सादरीकरण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर करण्यात आले.

Pratap Sarnaik: ठाण्यातील मेट्रोला ‘पॉड टॅक्सी’ने  जोडणार

ठाणे: घोडबंदर भागात 'पॉड टॅक्सी'ची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शुक्रवारी ठाणे पालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात यासंदर्भातील प्रकल्पाचे सादरीकरण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. मीरा-भाईंदर पालिका हद्दीतही हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबर वेळेची बचतही होणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला.

'ठामपा' च्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. यावेळी 'पॉड टॅक्सी'चे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे; परंतु तेथपर्यंत पोहोचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आला आहे. 'रोप-वे'प्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार आहे. पावसाळ्यात या भागात पाणी साचून होणाऱ्या कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे. ही टॅक्सी हवेत तरंगत चालणार आहे. तिचा ताशी 60 ते 70 किमी एवढा वेग असणार आहे. यातून 16 प्रवासी जाऊ शकतात.

हेही वाचा: 'बीडला ड्युटी नकोच'

पॉडटॅक्सी म्हणजे काय? 
पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट अर्था पॉड टॅक्सी ही टेक्निकल कार 
पूर्णपणे स्वयंचलित असून विनाड्रायव्हर
एकाच वेळी 3 ते 6 प्रवाशांचा प्रवास शक्य
उर्जेच्या मदतीनं चालणारी टॅक्सी 
प्रदूषण रोखण्यासाठी उत्तम पर्याय 

दरम्यान घोडबंदर भागात 'पॉड टॅक्सी'ची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शुक्रवारी ठाणे पालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात यासंदर्भातील प्रकल्पाचे सादरीकरण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. मीरा-भाईंदर पालिका हद्दीतही हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबर वेळेची बचतही होणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number