उल्हासनगरमध्ये इमारत दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू

उल्हासनगर: उल्हासनगर येथील नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोर साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं असून या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या इमारतीवरील चौथा मजल्याचा स्लॅब कोसळला. या इमारतीमध्ये एकूण २९ फ्लॅट होते. […]

उल्हासनगरमध्ये इमारत दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू

उल्हासनगर: उल्हासनगर येथील नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोर साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं असून या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या इमारतीवरील चौथा मजल्याचा स्लॅब कोसळला. या इमारतीमध्ये एकूण २९ फ्लॅट होते. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘मागील घटना घडल्यानंतर आपण क्षेत्रातील सर्व इमारतीना आपण नोटिशी बजावल्या आहेत. मागील दहा दिवसात ९०० इमारतींना नोटिसा दिल्या होत्या. त्या यादीत ही इमारत आहे की नाही? याची माहिती आपण घेत आहोत, असं उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सांगितलं आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना वाचवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ पथकाने मध्यरात्री बचावकार्य पूर्ण केलं.जखमी व्यतींना मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी रात्रीच पोहोचले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number