मुख्याध्यापकांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवणाऱ्या शिक्षकांवर तलवारीनं हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   मुख्याध्यापकांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवणाऱ्या शिक्षकांवर तलवारीनं हल्ला केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आलीय. शाळेत मुख्याध्यापकाच्या पदावर असतानाही केवळ हजेरी लावून शाळेचे मुख्याध्यापक धूम ठोकत होते. याचा आक्षेप नोंदवणाऱ्या ज्ञानोदय शाळेतील महाजन प्रजापती या शिक्षकावर तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे ही घटना वर्तकनगर पोलीस स्थानकात घडलीय. या हल्ल्यात शिक्षक गंभीर […]

मुख्याध्यापकांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवणाऱ्या शिक्षकांवर तलवारीनं हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

मुख्याध्यापकांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवणाऱ्या शिक्षकांवर तलवारीनं हल्ला केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आलीय.

शाळेत मुख्याध्यापकाच्या पदावर असतानाही केवळ हजेरी लावून शाळेचे मुख्याध्यापक धूम ठोकत होते. याचा आक्षेप नोंदवणाऱ्या ज्ञानोदय शाळेतील महाजन प्रजापती या शिक्षकावर तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडलीय.

विशेष म्हणजे ही घटना वर्तकनगर पोलीस स्थानकात घडलीय. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झालाय.

मुख्याध्यापक रमेशचंद्र मिश्रा यान आपल्यावर हल्ला केल्याची माहिती प्रजापती यांनी दिलीय. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली असून, याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकाच्या 3 सहकाऱ्याविरोधात वर्तकनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number