रिक्षात छेडछाड, घाबरलेल्या तरुणींनी धावत्या रिक्षेतून मारली उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ठाण्यात पुन्हा एकदा स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती झालीय. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नौपाडा भागात एका रिक्षाचालकाने दोन मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही मुलींनी चालत्या रिक्षातून उडी मारली. त्यात त्या जबर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर रिक्षाचालक फरार झालाय. या संपूर्ण घटनेने ठाणेकर संतप्त […]

रिक्षात छेडछाड, घाबरलेल्या तरुणींनी धावत्या रिक्षेतून मारली उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ठाण्यात पुन्हा एकदा स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती झालीय. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नौपाडा भागात एका रिक्षाचालकाने दोन मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही मुलींनी चालत्या रिक्षातून उडी मारली. त्यात त्या जबर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर रिक्षाचालक फरार झालाय. या संपूर्ण घटनेने ठाणेकर संतप्त झालेत.

या दोन्ही मुली रत्नागिरीवरून आल्या होत्या. आणि नौपाडा परिसरातून भिवंडीतील नातेवाईकांकडे जाण्यासाठी रिक्षातून जाण्यास निघाल्या होत्या. रिक्षा सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकाने त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या मुलींनी त्याला रिक्षा थांबवण्यास संगितले. पण त्याने रिक्षा न थांबवता आणखी वेग वाढवला. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी रिक्षातून उडी मारली. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने त्या दोघींना जुपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुजोर रिक्षाचालकांना आवर घाला, अशी मागणी ठाणेकर करत आहेत.

गेल्या वर्षी 1 ऑगस्टला स्वप्नाली लाडसोबत असाच प्रकार ठाण्यात झाला होता. त्यानंतर अनेक दिवस स्वप्नाली कोमात होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number