Stray Dog Attack : ‘आई, मी लवकर बरी होईन ना…?’; भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे पाच वर्षांच्या चिमुकलीचा ‘तो’ वाढदिवस ठरला शेवटचा

दिवा-आगासन रोडवरील बेडेकर नगरमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यानंतर उपचार सुरू असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा चौथ्या इंजेक्शननंतर मृत्यू झाला.

Stray Dog Attack : ‘आई, मी लवकर बरी होईन ना…?’; भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे पाच वर्षांच्या चिमुकलीचा ‘तो’ वाढदिवस ठरला शेवटचा

ठाणे (दिवा): नियती कधी आणि कोणत्या रूपात घाला घालेल याचा नेम नाही. दिवा-आगासन रोडवरील बेडेकर नगरमध्ये एका निरागस पाचवर्षांच्या चिमुकलीसोबत जे घडलं, ते ऐकून कोणत्याही पाषाणहृदयी माणसाच्या डोळ्यात पाणी येईल. 17 नोव्हेंबरची ती काळरात्र त्या कुटुंबासाठी काळ बनून आली. घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकलीवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवला आणि तिच्या खांद्याचा लचका तोडला. 

ज्या लेकीचा 3 डिसेंबरला वाढदिवस होता, तिच्या घरी आनंदाचं वातावरण असायला हवं होतं. पण वाढदिवसाच्या दिवशी ती चिमुकली रुग्णालयाच्या खाटेवर वेदनेने विव्हळत होती. तरीही, "माझी लेक बरी होईल," या आशेवर तिचे आई-वडील डॉक्टरांवर विश्वास ठेवून उपचार करत होते. "आई, मी लवकर बरी होईल ना?" असा प्रश्न ती चिमुकली आई वाडिलांना जगण्याच्या आशेने विचारात होती. 

डोंबिवलीच्या शास्त्री रुग्णालयात महिनाभर तिच्यावर उपचार सुरू होते. कुत्र्याचा चावा घेतल्यावर दिल्या जाणाऱ्या उपचारांचा भाग म्हणून तिला एकूण चार इंजेक्शन्स देण्यात येणार होते. मात्र, शेवटचं इंजेक्शन तिच्यासाठी जीवघेणं ठरेल, असं कोणालाच वाटलं नव्हतं.

हेही वाचा: Gold – Silver Rate Today: रेकॉर्ड ब्रेक तेजी! 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर ऐकून बसेल धक्का; जाणून घ्या सराफा बाजारातील सविस्तर हालचाली

16 डिसेंबर रोजी उपचारांचा शेवटचा टप्पा सुरू झाला. डॉक्टरांनी तिला चौथं इंजेक्शन टोचलं आणि काही वेळातच तिची प्रकृती कमालीची खालावली. ज्या मुलीची प्रकृती दोन दिवसांपूर्वीपर्यंत स्थिर होती, तिचा अचानक असा अंत झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. चौथ्या इंजेक्शननंतर नेमकं असं काय घडलं की चिमुकलीचा प्राण गेला? औषधाचा दर्जा खराब होता की डोसमध्ये चूक झाली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

या हृदयद्रावक घटनेमुळे पालिका रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर आणि औषध पुरवठ्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांचा हैदोस निष्पाप जीवांचे बळी घेत असतानाच, आता सरकारी उपचार पद्धतीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पारदर्शक चौकशीनंतरच स्पष्ट होईल, पण एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधार मात्र कायमचा हिरावला गेला आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: सरकारचा 'अपात्र' बहिणींवर सर्जिकल स्ट्राईक! 40 लाख महिलांच्या हप्त्यावर संक्रांत? तुमचे नाव तर नाही ना?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number