जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रोखून धरण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात काही काळ लोकल रोखून धरली होती.
मुंबईच्या दिशेने जाणारी फलाट क्रमांक चारवर जाणारी रेल रोको या कार्यकर्त्यांनी रोखून धरली होती. यावेळी ट्रॅकवर उतरलेल्या कार्यकर्त्यांमुळे वाहतूक काळी काळ विस्कळीत झाली होती.
भीमा-कोरेगाव प्रकरणात भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी हा रेल रोको करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.