जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
ठाण्यात शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ठाण्याच्या तीन हात नाका परिसरातून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीवर सहप्रवाशाने रिक्षाचालकाच्या साथीनेच अतिप्रसंग केल्याचा आरोप होत आहे.
बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालक आणि सहप्रवाशाविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाण्यात रिक्षाचालकानेच प्रवासी तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. यावर ठाणे पोलिस आणि वाहतूक पोलिस विभाग यांनी अनेक
उपाययोजना केल्यानंतरही पुन्हा दोन वर्षाने ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती घडल्याचं पाहायला मिळाले.