ठाकरेंनी नाकारले, शिंदेंनी स्विकारले

तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून बीडचे शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी तिरुपती बालाजीला नवस केला. रुईकर यांनी 2021 मध्ये तिरुपती बालाजी साठी पायी यात्रा काढली होती. परंतु, या दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांची परिस्थिती पाहून कुटुंबीयांना घर बांधून देण्याचा शब्द […]

ठाकरेंनी नाकारले, शिंदेंनी स्विकारले

तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून बीडचे शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी तिरुपती बालाजीला नवस केला. रुईकर यांनी 2021 मध्ये तिरुपती बालाजी साठी पायी यात्रा काढली होती. परंतु, या दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांची परिस्थिती पाहून कुटुंबीयांना घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. हाच शब्द पाळत शिंदेंनी बीड शहरात सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती यांना २५ लाखांचे दोन मजली घर बांधून दिले. सोमवारी त्या हक्काच्या घरात राहायला गेल्या.

बीड ते तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढणाऱ्या बीड येथील शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या कुटुंबियांसाठी टोलेजंग घर बांधून देण्यात आलं आहे. घरामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. या पदयात्रेत रुईकर यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेने घेतली होती. त्यानुसार रुईकर कुटुंबियांना घर बांधून देण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक होत आहे.

या घराचा ताबा रुईकर कुटुंबियांना देण्यात आला. त्यावेळी रुईकर यांच्या पत्नीने उद्धव ठाकरे यांच्या विषयी खंत बोलून दाखवली. उद्धव ठाकरे यांच्यासाठी पतीची जीव गेला. मात्र ठाकरे कुटुंबियांकडून साधी विचारपूस करायला कोणी आलं नाही. कुटुंबाची जबाबदारी घेतली. पण दीड वर्षांत साधा फोन केला नाही. आदित्य ठाकरेंचा दोन वेळा बीड जिल्ह्यात दौरा झाला. तेही भेटायला आले नाहीत. त्यामुळे पतीचं निधन वाया गेल्यासारखं वाटतं, असे रुईकर यांच्या पत्नीने बोलून दाखवलं.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली. त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून बीडमधील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर हे सहकारी श्रीधर जाधव यांना बरोबर घेत बीड ते तिरुपती अशा ११०० किमीच्या पायी यात्रेवर निघाले. रुईकर व त्यांचे सहकारी जाधव हे दररोज ३५ किमी पायी चालत होते. परंतु पदयात्रेत अचानक प्रकृती बिघडून कर्नाटकातील रायचूर येथे २५ डिसेंबर २०२१ मध्ये तापाने रुईकर यांचा मृत्यू झाला.रुईकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नी, मुलगी, मुलगा आणि वयोवृद्ध वडील हे रुईकरांवर अवलंबून होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबियांना आधार दिला. रुईकर कुटुंबियांची जबाबदारी ठाणे शिवसेनेने घेतली होती. त्यानुसार बीड जिल्ह्यातील बोडेश्वर येथे रुईकर कुटुंबियांना घर बांधून देण्यात आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number