भीमा-कोरेगाव आयोगासमोर शरद पवारांची साक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने साक्ष देण्यास बोलावले होते. त्यानुसार आज शरद पवार भीमा-कोरेगाव आयोगासमोर हजर झाले असून पवारांची आयोगासमोर साक्षनोंद पूर्ण झाली आहे. पवारांची भीमा-कोरेगाव आयोगासमोर साक्ष नोंदवताना झालेले सवाल-जवाब : वकील : तुमचं प्रतिज्ञापत्र कायद्यातील कोणत्या तरतुदींच्या आधारे आहे? शरद पवार : आपल्याकडील उपयुक्त माहिती सरकारला देणं […]

भीमा-कोरेगाव आयोगासमोर शरद पवारांची साक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने साक्ष देण्यास बोलावले होते. त्यानुसार आज शरद पवार भीमा-कोरेगाव आयोगासमोर हजर झाले असून पवारांची आयोगासमोर साक्षनोंद पूर्ण झाली आहे.

पवारांची भीमा-कोरेगाव आयोगासमोर साक्ष नोंदवताना झालेले सवाल-जवाब :


वकील : तुमचं प्रतिज्ञापत्र कायद्यातील कोणत्या तरतुदींच्या आधारे आहे?
शरद पवार : आपल्याकडील उपयुक्त माहिती सरकारला देणं हे नागरिकाचे कर्तव्य आहे. जर माझ्या माहितीनं सरकाला काही मदत मिळणार असेल तर टी माहिती देणे जरूरीचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे सध्याचं भादंविचे कलम १२४(अ) हे ब्रिटीशकालीन आहे. मात्र, त्याचा वापर हल्ली सर्रास केला जातोय.


वकील : दंगल झाली हे कधी कळलं?
शरद पवार : दुसऱ्या दिवशी माध्यमातल्या वार्तांकनातून परिस्थिती समजली.


वकील : भिडे आणि एकबोटे यांना ओळखता का?
शरद पवार : वर्तमानपत्रात त्यांच्याविषयी वाचले. कधी भेटलो नाही. व्यक्तिशः ओळख नाही.


वकील : प्रकाश आंबेडकर यांनी बंद पुकारला. त्याचे तीव्र पडसाद उमटले, नुकसान झाले. याची जबाबदारी कोणाची?
शरद पवार : मला याबाबत काही बोलायचं नाही. इतर कोणी काय भूमिका घेतली कार्यक्रम घेतले, त्याचे काय परिणाम झाले. मला यात जायची आवश्यकता वाटत नाही.


वकील : भीमा – कोरेगाव दंगल झाली. पोलीसांच्या व्यतिरिक्त कोण जबाबदार आहे?
शरद पवार : पोलिसांना जबाबदारी टाळता येणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखणे आणि समाज विघातक कारवाया रोखणे हीपोलिसांची जबाबदारी आहे.


वकील : कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन राज्य सरकार जबाबदार होते का?
शरद पवार : जे काही घडलं दुर्दैवी होते. अशी स्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी यंत्रणेची होती. त्यांनी कुचराई केली. वेळीच हे थांबवता आले असते. पण, त्यांनी तसे केले नाही. पोलिसांनी कारवाई न करता दुर्लक्ष केले.


 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number