वृत्तसंस्था, श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये सिक्युरिटी फोर्सेसना एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आले आहे. रविवारी रात्री उशीरा सुरु झालेली चकमक अखेर संपुष्टात आली. मात्र, या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी एसपी वैद यांच्या म्णणण्यानुसार मारले गेलेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते. या तिनही दहशतवाद्यांवर जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा आरोप […]