ऊसतोड कामगारांचा भीषण अपघात

बीडच्या माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी फाट्याजवळ सकाळच्या सुमारास पाठीमागून आलेल्या ट्रकने कर्नाटककडून जालना जिल्ह्यातील मंठा येथे जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींवर माजलगाव बीड परभणी औरंगाबाद येथे उपचार चालू असल्याचे […]

ऊसतोड कामगारांचा भीषण अपघात

बीडच्या माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी फाट्याजवळ सकाळच्या सुमारास पाठीमागून आलेल्या ट्रकने कर्नाटककडून जालना जिल्ह्यातील मंठा येथे जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींवर माजलगाव बीड परभणी औरंगाबाद येथे उपचार चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.

कवीता संतोष राठोड विरगव्हाण मंठा, वर्षा बाळु राठोड हांडी जिंतुर, शालु शिवाजी चव्हाण विरगव्हाण मंठा, शरद लिंबा चव्हाण करणावळ मंठा, लक्ष्मी शरद चव्हाण करणावळ मंठा, या जखमींवर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच बाकी जखमींवर बीड, औरंगाबाद, परभणी येथे उपचार चालू असल्याचे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए.पी.आय विजयसिंह झोनवाल यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number