जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
क्रिकेट विश्वात आपलं नाव अजरामर करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिनच तेंडुलकरचा 45 वा वाढदिवस आहे. क्रिकेटचा देव सचिनने 46 व्या वर्षात पदार्पण केलंय.त्याच्यावर जगभरातल्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
24 एप्रिल 1973 ला मुंबईतील शिवाजी पार्क जवळील रानडे रोडवर असणाऱ्या निर्मल नर्सिंग होममध्ये सचिनचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटचं वेड लागलं होतं.
त्याने आपल्या खेळीने क्रिकेट चाहत्यांना स्वर्गीय आनंद दिला. सचिनने केलेले प्रत्येक शतक हे राष्ट्रीय सणासारखे साजरे व्हायचे.