चौथ्या T-20 सामन्यात पुन्हा एकदा Team India ने न्यू झीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. पुन्हा एकदा सुपर ओव्हरमधून टीम इंडियाने विजयश्री खेचून आणली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये 166 धावांचं आव्हान उभं केलं.
न्यू झीलंडच्या टिम सेइफर्टने 57 धावा करत आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावरही आणलं.
शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी न्यू झीलंडला 7 धावा हव्या असताना भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या.
त्यामुळे New Zealand च्या फक्त 6 धावा झाल्या आणि पुन्हा मॅच टाय झाली.
त्यामुळे सुपरओव्हर खेळावी लागली. या सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारत 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली.