वृत्तसंस्था, मुंबई
कोकण, तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना लवकरच सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे.
कारण, की एयर हॉस्टेस प्रमाणे रेल हॉस्टेस नेमण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतली.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितले की, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘आयआरसीटीसी’ला तेजसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक
करण्याचे आदेश दिलेत.
या रेल्वे सुंदरी हिंदी आणि इंग्रजीत प्रवाशांशी संवाद साधू शकतील. कंत्राटी तत्त्वावर या रेल्वे सुंदरींची भरती करण्यात येईल. गतिमान एक्स्प्रेसमधील रेल्वे सुंदरींच्या
नेमणुका आयआरसीटीसीतर्फे करण्यात आल्या आहेत.