जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
सोलापुरात शिक्षणक्षेत्राला आणि गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य घडले आहे. शिक्षकाने आपल्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेश बगाडे असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. आपल्याच वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीला डोळ्यावर औषध उपचार करतो असा बहाणा करून त्या विद्यार्थिनीला आपल्या घरी नेऊन तिला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेप्रकरणी पीडित 15 वर्षीय मुलीने या नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी नराधम शिक्षक रमेश विठ्ठल बगाडे याला पोलिसांनी अटक केली आहे.