शिक्षकांकडून सातवीच्या मुलींचं वारंवार लैंगिक शोषण!

चाकणमध्ये जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेतील सातवीच्या काही मुलींवर शिक्षकानेच वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. विशेष म्हणजे पीडित मुलींनी आपल्या शिक्षकांकडे तक्रारही केली होती. परंतु, शाळेचे नाव बदनाम होईल, या भीतीमुळे या घटनेवर जाणीवपूर्वक पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पिंपरी-चिंचवडला गेल्या काही दिवसांपासून मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. […]

शिक्षकांकडून सातवीच्या मुलींचं वारंवार लैंगिक शोषण!

चाकणमध्ये जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेतील सातवीच्या काही मुलींवर शिक्षकानेच वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. विशेष म्हणजे पीडित मुलींनी आपल्या शिक्षकांकडे तक्रारही केली होती. परंतु, शाळेचे नाव बदनाम होईल, या भीतीमुळे या घटनेवर जाणीवपूर्वक पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

पिंपरी-चिंचवडला गेल्या काही दिवसांपासून मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बलात्कार, विनयभंग, छेडछाड यांसारख्या घटना वारंवार घडत आहेत. घटनेविषयी माहिती मिळताच माजी सरपंच रामदास मेदनकर यांनी शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षक आणि शिक्षिका यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी शाळेच्या चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

आरोपी शिक्षक बालाजी लिंबाजी डोंबे, मुख्याध्यापक नितीन जाधव आणि दोन महिला शिक्षकांवर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम शिक्षक बालाजी डोंबे अनेक दिवसांपासून शाळेतील इयत्ता सातवीच्या काही मुलींसोबत अत्यंत घृणास्पद वर्तन करत असल्याची तक्रार अनेक पीडित मुलींनी काही महिला स्वयंसेवी संस्थांकडे केली. याबाबत संबंधित स्वयंसेवी संस्थांनी मुख्याध्यापक आणि महिला शिक्षिकांना माहिती दिली. मात्र कुणीही संबंधित शिक्षकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. अखेरीस या बाबत वरीष्ठ प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधितांच्या विरोधात चाकण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.

अटक होण्याची शक्यता दिसू लागल्याने संबंधित आरोपी शिक्षकाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला खासगी रुग्णालयात केलं दाखल, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहे…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number