शिक्षक पतीकडून शिक्षिका पत्नीची गळा चिरुन हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा बुलडाण्यात एका शिक्षकानेच आपल्या शिक्षक पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सिंदखेड राजा तालुक्यातल्या सावित्री फुले चौकात ही घटना घडलीय. प्रफुल सरोदे असं आरोपीचं नाव असून सुलभा सरोदे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या दोघांमध्ये वर्षभरापासून भांडणं सुरू होती. त्यामुळे सुलभा या त्यांच्या भावाकडे राहत होत्या. अशातच भावाच्या घरातच या […]

शिक्षक पतीकडून शिक्षिका पत्नीची गळा चिरुन हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

बुलडाण्यात एका शिक्षकानेच आपल्या शिक्षक पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सिंदखेड राजा तालुक्यातल्या सावित्री फुले चौकात ही घटना घडलीय. प्रफुल सरोदे असं आरोपीचं नाव असून सुलभा सरोदे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या दोघांमध्ये वर्षभरापासून भांडणं सुरू होती. त्यामुळे सुलभा या त्यांच्या भावाकडे राहत होत्या.

अशातच भावाच्या घरातच या दाम्पत्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी प्रफुलने शिक्षिका असलेल्या पत्नीची गळा चिरून हत्या केलीय. माँ जिंजाऊंच्या जन्मगावातच ही घटना घडली असून सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number