वृत्तसंस्था, मुंबई
नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. यावेळी कररचनोबरोबरच इतर अनेक गोष्टीतही काही महत्वाचे बदल झालेत. करदात्यांना आयकरावर एक टक्के उपकर द्यावा लागणार असून अर्थसंकल्पात जे करप्रस्ताव मांडण्यात आले होते ते आता लागू होणार आहेत. शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे. त्याशिवाय, यंदाच्या बजेट शेती आरोग्य आणि पायाभूत सुविधा यावर विशेष भर देणारं बजेट आहे.
शेतीबाबतीत महत्त्वाचं म्हणजे शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 10 कोटी गरिब कुटुंबासाठी 5 लाख रुपयांची दरवर्षी हॉस्पिटलायझेशनसाठी तरतूद करण्यात आली आहे.