जय महाराष्ट्र न्यूज, अलिबाग
अलिबागच्या पीएनपी सांस्कृातिक कलाविकास मंडळाच्या नाट्यगृह लोकार्पण कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
यांच्यात काँग्रेस नेते नारायण राणेंवरुन चांगलीच जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली.
अलिबाग नंतर सहकार तत्वावरील दुसरे नाटयगृह सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात येणार असल्याची घोषणा विनोद तावडे यांनी केली. यावेळी त्यांनी राजन तेली यांचाही उल्लेख
आवर्जून केला.
नेमका तोच धागा पकडून सुनील तटकरे यांनी. सिंधुदुर्गातील सहकार चळवळ नारायण राणेंच्या हातात असल्याचं सांगत त्यांना घेण्याच्या प्रयोगातील हा सुरूवातीचा भाग
असून मुख्यमंत्र्यांनी रिमोट हाती घेतलाय फक्त कळ दाबायची बाकी आहे असे सहकारातील प्रयोग फार ठिकाणी करू नका असे वक्तव्य करताच सभागृहात हशा पिकला.