अखेर तनुश्रीची नाना पाटेकरांविरोधात पोलिसांत तक्रार

नाना पाटेकर- तनुश्री दत्ता वादामध्ये अखेर अभिनेत्री तनुश्री दत्ताकडून ओशिवरा पोलीसात केली तक्रार दाखल करण्यात आली आहे. तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.   10 वर्षांपूर्वी ‘हॉर्न प्लीज ओके’ या सिनेमातील एका आयटम साँगच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री हिने केला होता. या […]

अखेर तनुश्रीची नाना पाटेकरांविरोधात पोलिसांत तक्रार

नाना पाटेकर- तनुश्री दत्ता वादामध्ये अखेर अभिनेत्री तनुश्री दत्ताकडून ओशिवरा पोलीसात केली तक्रार दाखल करण्यात आली आहे. तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

10 वर्षांपूर्वी ‘हॉर्न प्लीज ओके’ या सिनेमातील एका आयटम साँगच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री हिने केला होता. या प्रकरणाचे बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर पडसाद पडलेले दिसून येत आहेत. अनेक जण तनुश्री दत्ताची बाजू घेत आहेत, तर बरेच जण नाना पाटेकर यांची बाजू घेत आहेत. मात्र जर तनुश्री दत्ता हिला नाना पाटेकरांसंदर्भात काही तक्रार असेल, तर ती पोलिसांमध्ये रीतसर गुन्हा का दाखल करत नाही, असा सवाल वारंवार उपस्थित होत होता. 

 

आज जेव्हा नाना पाटेकर हे राजस्थानातून शुटिंग संपवून मुंबईत दाखल झाले आहेत. सोमवारी ते या विषयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. नाना यांच्या वकिलाने यापूर्वीच तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र तनुश्री दत्ताने आज पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number