अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलिसांकडे नाना पाटेकर यांची नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
तनुश्रीने आपल्या वकिलांमार्फत या चाचण्या करण्यासाठी ओशिवरा पोलिसांकडे अर्ज केला आहे.
तसेच तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, सामी सिद्दीकी आणि राकेश सारंग यांचीदेखील नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
तनुश्रीने 10 ऑक्टोंबरला ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये या चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.