जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
मुंबई-पुणे जुन्या मार्गावरही पेट्रोलचा टँकर पलटला आहे. रायगडमध्ये रसायनीजवळ हा अपघात झाला.
अपघातानंतर टँकरनं पेट घेतला. त्यात 7 जण जखमी झालेत.
अपघातामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद कऱण्यात आली होती. सावलामार्गे ही वाहतूक वळवण्यात आली.
तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर पलटला. अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. त्यामुळे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.