वृत्तसस्था, मुंबई येत्या रविवारी ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’ सोहळा रंगणार आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावाने ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’मध्ये विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. अभिनेत्री तमन्ना भाटिया पहिल्या ‘श्रीदेवी पुरस्कारा’ची मानकरी ठरली आहे.