…अन् कर्मचार्‍याच्या प्रसंगावधाने बचावले अनेक विद्यार्थ्यांचे प्राण

वृत्तसंस्था, मुंबई तामिळनाडूमध्ये एका सफाईकामगाराने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. तामिळनाडूतील नागप्पट्टिनम येथील एका प्राथमिक शाळेमध्ये पाण्याची टाकी साफ करण्यासाठी काही विषारी घटकांचा वापर करण्यात आला होता. गुरूवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पोहचलेल्या सफाईकर्मचार्‍याने पाण्याचा नळ उघडला तेव्हा त्याला पाण्याच्या रंगामध्ये आणि वासामध्ये काही बदल आढळला. सफाई कर्मचार्‍याने दक्षता बाळगत त्वरीत हा सर्व प्रकार पर्यवेक्षकाच्या कानावर घातला. […]

…अन् कर्मचार्‍याच्या प्रसंगावधाने बचावले अनेक विद्यार्थ्यांचे प्राण

वृत्तसंस्था, मुंबई

तामिळनाडूमध्ये एका सफाईकामगाराने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. तामिळनाडूतील नागप्पट्टिनम येथील एका प्राथमिक शाळेमध्ये पाण्याची टाकी साफ करण्यासाठी काही विषारी घटकांचा वापर करण्यात आला होता. गुरूवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पोहचलेल्या सफाईकर्मचार्‍याने पाण्याचा नळ उघडला तेव्हा त्याला पाण्याच्या रंगामध्ये आणि वासामध्ये काही बदल आढळला.

सफाई कर्मचार्‍याने दक्षता बाळगत त्वरीत हा सर्व प्रकार पर्यवेक्षकाच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस  तपासामध्ये पाण्याच्या टाकीजवळ क्लोरोएसेटिनिलिड हर्बिसाइड हे विषारी द्रव्य आढळले. त्यावरून हे विषारी घटक पाण्यात मिसळल्याचे त्यांच्या लक्षात आले.

नागाम्मलच्या या दक्षतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे. नागाम्मलच्या या उत्तम कामाची दखल घेत प्रजासत्तकदिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला.

आरोग्यविभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दुषित पाणी जर शरीरात गेले असते तर आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. तसेच विषारी घटक असल्याने हे पाणी जीवघेणेदेखील ठरू शकले असते.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number