लेडिज हॉस्टेलवर इनकमटॅक्सची धाड; सापडले हिरे-सोन्याचे दागिने, ब्रँडेड घड्याळे आणि कोट्यावधीची रोकड

वृत्तसंस्था, तामीळनाडू   तामीळनाडूमध्ये एका महिला कॉलेजच्या हॉस्टेलवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये धक्कादायक घबाड सापडलंय. आयकर विभागाला या ठिकाणी लाखो रुपयांचे सोने, हिऱ्यांचे दागिने, रोकड आणि कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रे सापडली आहेत. एआयएडीएमके पक्षाच्या सर्वेसर्वा शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित संपत्तीचा तपास करताना आयकर विभागाने या हॉस्टेलवर धाड टाकली होती.ॉ आयकर विभागाने शशिकला यांचा भाऊ […]

लेडिज हॉस्टेलवर इनकमटॅक्सची धाड; सापडले हिरे-सोन्याचे दागिने, ब्रँडेड घड्याळे आणि कोट्यावधीची रोकड

वृत्तसंस्था, तामीळनाडू

 

तामीळनाडूमध्ये एका महिला कॉलेजच्या हॉस्टेलवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये धक्कादायक घबाड सापडलंय. आयकर विभागाला या ठिकाणी लाखो रुपयांचे सोने, हिऱ्यांचे दागिने, रोकड आणि कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रे सापडली आहेत.

एआयएडीएमके पक्षाच्या सर्वेसर्वा शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित संपत्तीचा तपास करताना आयकर विभागाने या हॉस्टेलवर धाड टाकली होती.ॉ

आयकर विभागाने शशिकला यांचा भाऊ व्ही. धीवाहरन यांच्या मालकीच्या सेंगमाल थय्यर एज्युकेशनल ट्रस्ट वुमन्स कॉलेजवर धाड टाकली. त्यावेळी एका खोलीतून अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 6 कोटींची रोकड, 2 कोटी 4 लाखांचे साडे आठ किलो सोनं आणि 1200 कोटींची गुंतवणूक केलेली कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number