पुण्याच्या दुसऱ्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 

पुण्यातील दुसऱ्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. या आधी मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

पुण्याच्या दुसऱ्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 

१७ सप्टेंबर, २०२४, पुणे : पुण्यातील दुसऱ्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. या आधी मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली. या मिरवणुकीत पारंपारिक पोशाखात कार्यकर्ते सहभागी झाले. 


अतिशय उत्साहपूर्ण तरीही भावुक वातावरणात पुणेकरांनी तांबडी जोगेश्वरी गणपतीला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत  पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number