‘माझी कुणाशीही भेट झाली नाही’

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, या सर्व चर्चा जयंत पाटलांनी फेटाळून लावल्या असून माझी कोणाशीही चर्चा झाली नाही, मी अमित शाह यांना भेटलो नसल्याचे स्पष्टीकरण पाटलांनी दिले. जयंत पाटील काय म्हणाले? “प्रसारमाध्यमांवरील बातम्या ऐकल्या आणि माझे मनोरंजन […]

‘माझी कुणाशीही भेट झाली नाही’

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, या सर्व चर्चा जयंत पाटलांनी फेटाळून लावल्या असून माझी कोणाशीही चर्चा झाली नाही, मी अमित शाह यांना भेटलो नसल्याचे स्पष्टीकरण पाटलांनी दिले.

जयंत पाटील काय म्हणाले?
“प्रसारमाध्यमांवरील बातम्या ऐकल्या आणि माझे मनोरंजन झाले. मी कालही पवार साहेबांना भेटलो. शनिवारी रात्री मी माझ्या पक्षातले वरिष्ठ आमदार आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आणि आज सकाळी देखील मी पवार साहेबांना भेटलो. त्यामुळे ज्या बातम्या चालवल्या आहेत, त्यामध्ये तथ्य नाही. मी पुण्यात भेटलो किंवा अन्य कुठे भेटलो, यात कुठलीही स्पष्टता नाही”.

“मी अमित शाह यांना कधी भेटलो याचे संशोधन करा. याबद्दलच्या चर्चा कोण करतंय, त्याबाबतही चौकशी करा. मी कालही इथेच होतो आणि आजही इथेच आहे. ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या बातम्यांमध्ये कुठेतरी कोणी गैरसमज पसरवत आहे, असं मी म्हणणार नाही, कारण या बातम्या माध्यमांवरच्या आहेत. मात्र, माझी सर्वांना विनंती आहे, अशा बातम्या चालवताना खात्री बाळगूनच चालवायला हव्यात”, असेही पाटील म्हणाले.

“जर अशा पद्धतीने कुणाला भेटायचे असेल तर तुम्हाला सांगेल. तुम्हाला सांगूनच जाईल. भाजप अशा प्रकारच्या बातम्या पेरतो असे मी म्हणणार नाही. कारण बातम्या पेरणारे तुम्ही. त्यांना बडबडून काय उपयोग?, कुणी बातम्या पेरल्या याची माहिती सध्यातरी माझ्याकडे नाही”, असे स्पष्टीकरण देत जयंत पाटलांनी चर्चांना पूर्ण विराम दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number