चर्चा निष्फळ, संप चिघळणार

  एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होत आहे. तसेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तर अनेकांना निलंबित करण्यात आले. तरीही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. मात्र या बैठकीतही एसटी कर्मचाऱ्याचंया मागणीवर […]

चर्चा निष्फळ, संप चिघळणार

  एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होत आहे. तसेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तर अनेकांना निलंबित करण्यात आले. तरीही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. मात्र या बैठकीतही एसटी कर्मचाऱ्याचंया मागणीवर तोडगा निघालेला नाही.

  परिवहन मंत्री अनिल परब आणि संपकारी यांच्यात दिर्घकाळ चर्चा रंगली असून त्यांची चर्चा निष्फळ ठरली आहे. मात्र ही बैठक सकारात्मक ठरली असल्याची माहिती परिवनह मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य न करता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करू शकत नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

 एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी नाकारल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिकच चिघळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती अनिल परब यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number